कोल्हापूर, 12 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सत्ता मिळवली आहे. नव्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र, गोकुळवर महायुतीची सत्ता निश्चित होताच, प्रचारकाळात रागाच्या भरात केलेले एक विधान चुकीचे होते, अशी उपरती आता मंत्री हसन मुश्रीफ यांना झाली आहे.
गोकुळच्या संचालक मंडळात एकूण २५ जागांपैकी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीला १३ जागा मिळवून बहुमत मिळाले होते, तर महायुतीकडे १२ जागा होत्या. अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक होता. सतेज पाटील गटाने शासननियुक्त ४ संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने या चारही शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिला. त्यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केल्याने महायुतीचे १२ आणि शासन नियुक्त ४ असे एकूण १६ मतांचे संख्याबळ झाले आणि सत्ता सतेज पाटील गटाकडून महायुतीकडे गेली.
या राजकीय संघर्षात सतेज पाटील यांच्या विरोधात हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. न्यायालयाचा निकाल महायुतीच्या विरोधात गेल्यास आपले १२ संचालक गैरहजर राहतील आणि कोरमअभावी गोकुळवर प्रशासक नेमावा लागेल, असा थेट इशारा मुश्रीफ यांनी दिला होता. राज्यात सत्ता असल्याने प्रशासक आला तरी गोकुळ महायुतीच्याच ताब्यात राहील आणि सतेज पाटील गटाच्या १३ संचालकांची ती शेवटची सभा ठरेल व त्यांना घरी बसावे लागेल, असे नियोजन मुश्रीफ यांनी मांडले होते.
आता याच आक्रमक विधानावर मुश्रीफ यांनी खंत व्यक्त केली आहे. आपली चूक कबूल करत मुश्रीफ म्हणाले, “ते वाक्य रागाच्या भरात बोलून गेलो. वास्तविक पाहता मी तसे बोलायला नको होते. सौम्य शब्दात मी अनेकदा इशारे दिले होते. पण समोरील लोक ऐकायला तयार नव्हते. साहजिक रागाच्या भरात मी ते वाक्य बोलून गेलो. माझ्या म्हणण्याचा भावार्थ एवढाच होता की न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर गोकुळवर प्रशासक नेमावा लागेल. परंतु समोरील लोकांनी आक्षेप घेतला. मी ते वाक्य खरोखर बोलायला नको होते.”
📌 महत्वाच्या बातम्या
- सराव सत्रात अर्शदीप सिंगने बाद केल्यानंतर विराट कोहली संतापला
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड वनडेपूर्वी मिचेल मार्शचा ‘सँडपेपरगेट’च्या प्रश्नावर भन्नाट रिप्लाय
- दिवाळीत सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी; पिठलं-भाकरी खात जाणून घेतल्या अडचणी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








