प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून, या पराभवानंतर आमदार सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या राजेश पाटील यांनी शशिकांत पाटील यांचा पराभव केल्याने सतेज पाटील यांच्या हातून गोकुळची सत्ता निसटली आहे. या सत्तासंघर्षानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रातील सामान्य माणूस आता आंदोलनात आला आहे. केवळ गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी चार जणांची नेमणूक करण्यात आली असून, हा कोरमचा विषय नव्हता. त्यांना फक्त सत्ता मिळवायची होती.” हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणल्याचा आरोप करत, या प्रकरणात आता कोर्टाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यांची वैचारिक पातळी कमी होत चालल्याची टीका करत सतेज पाटील यांनी त्यांनी डी. वाय. पाटील यांचा अपमान केल्याचे म्हटले. “सरकारी यंत्रणेतून मला धमकी देऊ नका, लढायचं असेल तर २०२९ मध्ये समोरासमोर लढा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले. दौलत कारखाना देताना हसन मुश्रीफांना राजेश पाटील आठवले नाहीत, मात्र आता त्यांच्यावर अचानक प्रेम आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
माझ्यावर एकेरी भाषेचा वापर करून मला महाराष्ट्रभर पोहोचवल्याचे सांगत, महायुतीने जनतेचा कौल घालवण्याचे पाप केल्याची टीका त्यांनी केली. आज कोणाचा उन्माद दिसला आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या संचालकांची नेमणूक केवळ तीन महिन्यांसाठीच करण्यात आली आहे. गोकुळमध्ये भविष्यात काही चुकीचे घडल्यास आमचे संचालक त्याला विरोध करतील, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा; स्मृती मानधना कसोटी कर्णधार, जेमिमाचे पुनरागमन
- लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार? हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
- आयपीएल घोषणेपूर्वीच अर्शदीप सिंगच्या मुंबई इंडियन्स प्रवेशावर वडिलांचे शिक्कामोर्तब
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








