तुमचा काचेचा महाल झालाय, मी पण पाटील आहे; सतेज पाटलांचे चंद्रकांतदादांना आव्हान

गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीच्या राजेश पाटील यांच्या निवडीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.

Published On: 

Satej Patil speaking about Gokul Chairman election

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांची निवड झाली आहे. या निकालानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले. ‘तुमचा काचेचा महाल झाला आहे, मी पण पाटील आहे’, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांनी दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर दिले.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवल्याने आता कोल्हापूरमधील ही लढाई न्यायालयात पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांवर सडकून टीका केली.

चंद्रकांतदादा पाटील जसे मोठे होत आहेत, तशी त्यांची वैचारिक पातळी खालावत चालली असल्याचा घणाघात सतेज पाटील यांनी केला. आपली आणि त्यांची लढाई २००९ पासून सुरू आहे, मात्र यात स्वर्गीय डी. वाय. पाटील यांचा अपमान करण्याचा प्रयत्न तुम्ही का केला? त्यांना या वादात आणण्याची काय गरज होती, असा संतप्त सवाल सतेज पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

कोल्हापूरकरांवर झालेल्या अन्यायामुळे कालच्या आपल्या सभेला बाहेरूनही लोक आले होते आणि ही सभा महायुतीच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे सतेज पाटील म्हणाले. आज झालेल्या महायुतीच्या सभेवर टीका करताना त्यांनी विचारले की, आमच्या सभेत जो ‘करंट’ होता तो त्यांच्या सभेत दिसला का? त्यांचे चेहरे पाहा, त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते का? असा टोलाही त्यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही