मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त होईल, काही शिल्लक राहणार नाही, चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला यश. विजयानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल आणि गंभीर इशारा.

Published On: 

Chandrakant Patil praises Devendra Fadnavis

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निकालानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे वटारले, तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल,” असा थेट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सतेज पाटील यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला फक्त शिक्षणमंत्री म्हणून आदेश दिला, तरी बंटी पाटलांचं काहीच शिल्लक राहणार नाही. “तुमच्यात धमक असेल तर मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये कामं घेऊन जाऊ नका, राहुल गांधींकडून ती कामं करून घ्या,” असं आव्हानही त्यांनी दिलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आणि त्यांच्याकडूनच कामे करून घ्यायची, या शब्दांत पाटील यांनी सतेज पाटलांना लक्ष्य केलं.

दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा पंधरा दिवसांनी सुटला आहे. कोरमअभावी तहकूब झालेल्या या सभेची कोंडी अखेर फुटली असून १० नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. न्यायालयाने अंतिम निकालाची तारीख राखून ठेवत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार झालेल्या प्रक्रियेत महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे राजेश पाटील आणि सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर यांच्यात लढत झाली, ज्यामध्ये राजेश पाटील विजयी झाले.

या महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रियेत गोकुळ दूध संघाच्या २५ निवडून आलेल्या संचालकांनी आणि शासनाने नियुक्त केलेल्या ४ संचालकांनी सहभाग घेतला होता. या विजयासोबतच महायुतीने गोकुळच्या अध्यक्षपदावर आपला दावा सिद्ध केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही