पुणे, 11 नोव्हेंबर: पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विश्रांतवाडी परिसरात जुन्या वादाच्या रागातून एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या पाच अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने एका १७ वर्षीय मुलावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
रविवारी रात्री शहरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह असताना हा धक्कादायक प्रकार घडला. तक्रारदार १७ वर्षीय मुलगा आपल्या घरी परतत होता. त्यावेळी मुख्य आरोपी सूरज मार्शल चौरी (वय १९, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) याने त्याला गाठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सूरजने आपल्या अल्पवयीन साथीदारांना बोलावून घेतले आणि मुलाच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर तसेच पायावर तलवारीने सपासप वार केले.
या भीषण हल्ल्यानंतर जखमी मुलाने थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली आणि मुख्य आरोपी सूरज चौरी याला अटक केली. तसेच त्याच्या पाचही अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील पाच जण अल्पवयीन आहेत. तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विलीनीकरणाच्या चर्चेत मोठी घडामोड! अजित पवार गटाचे २० आमदार शरद पवारांच्या भेटीला?
- रत्नागिरीत गिफ्ट दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या बंबात पाणीच नसल्याने नागरिकांचा संताप
- जन्मदात्या बापाकडून १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आईने बसवलेल्या सिक्रेट कॅमेऱ्यातून प्रकार उघड
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







