पुण्यात माजी सरपंचाची गुंडगिरी, बिलाच्या वादातून हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण

लोणी काळभोर येथे बिलाच्या वादातून माजी सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Published On: 

Pune crime news Loni Kalbhor hotel assault

पुणे, 11 नोव्हेंबर: पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एका माजी सरपंचाने साथीदारांच्या मदतीने हॉटेलमध्ये घुसून राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवणाच्या बिलावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालक, त्यांचे कुटुंबीय आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, काचेची भांडी फेकून मारल्याने हॉटेल व्यावसायिक यात गंभीर जखमी झाले आहेत.

या मारहाणीप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर यांच्यासह अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये घडलेला हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एन्जेल हायस्कूलजवळ असलेल्या ‘हॉटेल जगदंबा’मध्ये ही घटना घडली. ५६ वर्षीय राजेंद्र चौधरी हे गेल्या ३० वर्षांपासून हे हॉटेल चालवतात. घटनेच्या रात्री आरोपी रामचंद्र काळभोर हा हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता.

जेवण संपल्यानंतर त्याने ऑनलाइन पद्धतीने बिल भरले आणि “माझे बिल जमा झाले का?” अशी विचारणा केली. त्यावर हॉटेल मालकाने “हो, तुमचे बिल जमा झाले आहे,” असे सांगितले. मात्र, त्यानंतर कोणतीही चिथावणी नसताना रामचंद्र याने अचानक अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या शिवीगाळीला विरोध केल्यानंतर वाद अधिकच वाढला. रामचंद्रसोबत असणारा माजी सरपंच राहुल काळभोर आणि इतर दोघांनी हॉटेल मालक राजेंद्र चौधरी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य व कामगारांवर हल्ला चढवला. त्यांनी अमानुष मारहाण करत काचेची भांडी भिरकावली, ज्यामुळे काच लागून फिर्यादी राजेंद्र चौधरी गंभीर जखमी झाले.

या राड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर हॉटेल मालक राजेंद्र चौधरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या फिर्यादीवरून चार जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही