महाड, 11 नोव्हेंबर: शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. यावरून गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अपघात की घातपात या चर्चेला उधाण आले असून तटकरे यांनी कदम यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. या वादावर आता रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी महाडमध्ये भाष्य केले आहे.
महाड येथे बोलताना गोगावले यांनी तटकरे यांच्या खासदारकीबाबत मोठा दावा केला. “रामदास कदम हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. निवडणुकीत सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कदम यांनीच शिफारस केली होती. तसेच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेत त्यांनी ती पार पाडली,” असे गोगावले म्हणाले.
या दोन्ही नेत्यांमध्ये नंतर नेमके काय बिनसले याची आपल्याला कल्पना नसल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. “वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये जसा चांगला समन्वय (ट्युनिंग) आहे, तसाच तो खालच्या पातळीवरही असायला हवा,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद जुनाच आहे. यापूर्वी पालकमंत्री पदावरून दोन वर्षे मोठा संघर्ष झाला होता. त्यानंतर समेट घडून अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. मात्र, कोकणातील राजकीय वाद थांबलेला नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा सर्वात मोठा वनडे विक्रम
- मोहम्मद शमीच्या कसोटी निवृत्तीनंतर रवी शास्त्री नाराज; अजित आगरकर, गौतम गंभीर यांच्यावर निशाणा
- सोलापूर: आडेगावच्या बिरोबा यात्रेत मराठा आणि लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये राडा, तुंबळ हाणामारी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








