बारामती, 10 नोव्हेंबर: अजित पवार यांच्या विमान अपघातावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. आज बारामती येथे आल्यावर तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्मृतीस्थळावर कोणतेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी ऐन दिवाळीत रामदास कदम यांनी तटकरे यांच्यावर आरोपांची झोड उठवली होती. या विमान अपघातामागे तटकरे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करत कदम यांनी थेट चौकशीची मागणी केली होती. तत्पूर्वी, हा अपघात होता की घातपात, यावरून आमदार रोहित पवार यांनीही मोठे वादळ निर्माण केले होते.
आज पाडव्याच्या निमित्ताने सुनील तटकरे बारामतीत अजितदादांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या तीन दशकांपासून पाडव्याला आवर्जून बारामतीत येऊन उसळलेल्या जनसागराचा अनुभव घेत असल्याचे ते म्हणाले. या भेटीत दादांची आणि शरद पवार यांचीही भेट होत असे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
“दादांशिवाय बारामतीत येण्याचा दुर्दैवी आणि अभागी क्षण आमच्यावर आला असून, याचे प्रचंड दुःख मनात आहे. दादांशिवाय पाडवा मनाला पटत नाही, पण नियतीपुढे कोणाचे चालत नाही,” अशा भावना तटकरे यांनी व्यक्त केल्या. पाडव्याच्या शुभेच्छा घेण्यासाठी कृतज्ञतेच्या भूमिकेतून आपण या पवित्र स्मृतीस्थळी आलो असून, त्यामुळे येथे कोणतेही राजकीय भाष्य मी करणार नाही, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान; शांतता राखण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
- पक्ष वाढवायचा की संपवायचा? आपल्याच पालकमंत्र्यांवर एकनाथ शिंदे संतप्त
- सुनील तटकरे पुण्यात, सुनेत्रा पवारांची घेणार भेट; विलिनीकरणाच्या चर्चेसह अर्थखात्यावर केले थेट भाष्य
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








