प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर: अजित पवार यांच्या दहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत, शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी या प्रकरणात खासदार सुनील तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार याच अपघाताच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन आणखी एक खुलासा करण्याच्या तयारीत असतानाच, रामदास कदम यांनी तटकरेंवर केलेल्या या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना रामदास कदम यांनी त्यांच्यावर बेईमानीचा ठपका ठेवला. तटकरे हे कोणाचेच होऊ शकत नाहीत हे आता सिद्ध झाले असल्याचे ते म्हणाले. महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात काम केले. एवढेच नाही तर गुहागर मतदारसंघात त्यांनी थेट ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर जाधव यांना रसद पुरवल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला.
कोकणातील १६ धरणांच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांचा संदर्भ देत कदम यांनी पोयनार धरणाच्या रखडलेल्या कामावरूनही तटकरेंना लक्ष्य केले. पोयनार ही तटकरेंची सासरवाडी असून, या धरणाचे काम तब्बल २५ वर्षे बंद असल्याने १४ गावे पाण्याला मुकली, हे तटकरेंचेच पाप असल्याची घणाघाती टीका कदम यांनी केली. तसेच, अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर हे सर्व आरोप मागे घेण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
शिष्टाचाराच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करताना कदम यांनी तटकरेंना उद्देशून ‘औकातीत राहा, जास्त मस्ती दाखवली तर सोडणार नाही’ असा थेट इशारा दिला. तटकरेंना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसून, ते ज्या मेव्हण्याला सांगतात त्याची आपल्या बाजूला बसायची लायकी नाही, असा टोला त्यांनी लगावला. आपले भाषण संपत आलेले असताना तो येतो आणि माजी जिल्हा परिषद सदस्य खाली बसलेले असताना थेट आपल्या (तटकरे समर्थक) खुर्चीवर बसतो, निवडून आला म्हणून तो स्वतःला तटकरे किंवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष समजतो का, असा संतप्त सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही भाजप नेत्यांची दंतकथाच’; राज ठाकरेंची फटकेबाजी
- गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
- व्हिक्टोरियन क्रिकेटमधील बॉल टॅम्परिंगबाबत स्कॉट बोलंडने उस्मान ख्वाजाचे दावे फेटाळले
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








