रॉकेट फटाक्यांवर बंदी; आगीच्या घटनांनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

ठाणे जिल्ह्यात आगीच्या वाढत्या घटनांमुळे रॉकेट फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतही लवकरच याबाबतचे परिपत्रक निघण्याची शक्यता आहे.

Published On: 

rocket firecrackers ban in thane district due to fire incidents

ठाणे, 9 नोव्हेंबर: दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना वाढल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्याच्या महसुली हद्दीत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांवर ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ या कालावधीसाठी पूर्णपणे बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हे तातडीचे आदेश जारी केले आहेत.

ठाणे जिल्ह्यापाठोपाठ मुंबईतही रॉकेट फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून, मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच अधिकृत परिपत्रक निघण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ११ वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या असून यात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही नागरिक हातात धरून रॉकेट उडवत असल्याचे आणि या फटाक्यांचे जळते अवशेष निवासी इमारती व ज्वलनशील वस्तूंवर पडून आगीचा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हा बंदी आदेश ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ८ जानेवारी २०२७ च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील. सार्वजनिक आणि खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवार आणि सर्व रहिवासी भागांमध्ये हे निर्बंध असतील. इतर फटाक्यांचा वापर मात्र प्रचलित कायदे आणि न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहून करता येईल. गृहनिर्माण संस्थांनीही आपल्या सभासदांना या आदेशाची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ आणि ६० नुसार कठोर कारवाई केली जाईल. या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन संकुलातील १७ मजली ‘रहेजा कार्लाइन’ इमारतीला नुकतीच भीषण आग लागली होती.

रहेजा कार्लाइन इमारतीत रात्री साडेआठच्या सुमारास आठव्या मजल्यावर लागलेली आग काही वेळातच १४ व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. यात ५० रहिवासी अडकले होते, मात्र ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी सर्वांची सुखरूप सुटका केली. दुसरीकडे, वसई-विरार शहरात ८ नोव्हेंबरच्या सकाळपासून ९ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत तब्बल २४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यात गॅस सिलिंडर, इमारती आणि कारखान्यांचा समावेश आहे.

नालासोपारा-विरार दरम्यान भूमिगत रेल्वे केबलला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेलाही याचा फटका बसला. वसई-विरारमधील या आगीच्या घटनांमध्ये दोन जण किरकोळ भाजले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही