५०० आणि २००० च्या नोटांवर बंदी घाला; मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या मागणीमुळे पुन्हा नोटबंदीच्या चर्चेला उधाण

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ५०० आणि २००० रुपयांच्या मोठ्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केल्याने पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरू झाली आहे.

Published On: 

Chandrababu Naidu speaking on currency ban and digital payments

प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी ५०० आणि २००० रुपयांच्या मोठ्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद करण्याची मागणी केली आहे. सोमवारी केलेल्या या विधानामुळे २०१६ च्या नोटबंदीला १० वर्षे पूर्ण होत असतानाच, देशात पुन्हा एकदा नोटबंदीचे संकट येणार का, या चर्चेला राजकीय आणि आर्थिक वर्तुळात उधाण आले आहे.

मोठ्या रकमेचे रोख व्यवहार थांबवल्यास देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येईल आणि गरिबी हटवणे अधिक सोपे होईल, असा दावा मुख्यमंत्री नायडू यांनी केला. डिजिटल पेमेंटचे समर्थन करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यापूर्वीच हा मुद्दा मांडला असून ते यावर पुनर्विचार करत असल्याचे सांगितले. नायडू म्हणाले, “डिजिटल चलन अहवालासाठी मीच सूचना केल्या होत्या. ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे बंद करून केवळ १०० आणि २०० रुपयांच्या लहान नोटाच चलनात ठेवाव्यात, ही मागणी मी आज पुन्हा करत आहे.”

काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रातोरात रद्द केल्या होत्या. या ऐतिहासिक निर्णयाला दहा वर्षे उलटल्यानंतर टीडीपी प्रमुखांनी पुन्हा अशीच मागणी केली आहे. व्यवस्थेतील त्रुटींमुळे भ्रष्टाचार हे एक दुष्टचक्र बनले असून त्यातून बाहेर पडणे कठीण आहे, मात्र आपण दीर्घकाळापासून या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी केल्यास देशात संपत्ती निर्मिती आणि गरिबी निर्मूलन सहज शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिजिटल चलन हेच भविष्य असल्याचे सांगताना नायडू यांनी निवडणुकांमधील पैशांच्या गैरवापराचाही मुद्दा उपस्थित केला. निवडणुका पैशांच्या जोरावर न लढवता समाजसेवेच्या भावनेतून लढल्या गेल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या अंदाधुंद वाटपाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही