🕒 1 min read
तुमच्या खिशातल्या ५०० किंवा २०० च्या नोटेकडे कधी नीट पाहिलंय का? त्यावरचं हसणारं गांधीजींचं (Mahatma Gandhi) चित्र बदलणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. सोशल मीडियावर अनेकदा दावा केला जातो की, आता नोटांवरून गांधीजींचा फोटो जाऊन त्याजागी दुसऱ्या महापुरूषांचा फोटो येणार. पण खरंच असं काही घडणार आहे का? की ही फक्त एक अफवा आहे? यामागचं सत्य आणि आरबीआयचे (RBI) नियम नेमकं काय सांगतात, हे समजून घेणं गरजेचं आहे.
गेल्या काही वर्षांत नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असावेत, अशी मागणी अनेकदा सोशल माध्यमातून जोर धरते. पण तांत्रिकदृष्ट्या विचार करता, नोटेवरचा फोटो बदलणं इतकं सोपं आहे का? आरबीआय अधिनियम १९३४ (RBI Act 1934) नुसार, भारतीय चलनी नोटा जारी करण्याचा आणि त्यातील बदलांचा अधिकार हा फक्त रिझर्व्ह बँकेला आहे.
Mahatma Gandhi Photo on Note
आरबीआयला जरी नोटा जारी करण्याचा अधिकार असला, तरी नोटेचं डिझाईन, रंग, आणि त्यावरचा फोटो बदलण्यासाठी कलम २५ अंतर्गत केंद्र सरकारची मंजुरी (Central Government Approval) बंधनकारक असते. आरबीआयच्या शिफारशी आणि तांत्रिक बाबी तपासूनच सरकार अंतिम निर्णय घेऊ शकते. म्हणजेच, ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि कायदेशीर असते.
आता मूळ मुद्द्यावर येऊ. सध्या गांधीजींचा फोटो बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आरबीआय किंवा केंद्र सरकारकडे विचाराधीन नाही. आरबीआयने यापूर्वीच स्पष्ट केलंय की, सध्याच्या भारतीय चलनात कोणताही बदल करण्याचा विचार नाही. त्यामुळे व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. मागणी आणि जनभावना एकीकडे, पण सध्या तरी ‘बापू’च नोटेवर कायम आहेत, हेच त्रिवार सत्य आहे!
📌 महत्वाच्या बातम्या
- गुड न्यूज! आता PF चे पैसे निघणार थेट UPI ने? एप्रिलपासून नवीन नियम, EPFO चा मोठा धमाका!
- बापरे! आधी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार,आता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज; थेट व्हॉटसअपवर…
- “सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू..”; नितेश राणेंचा हल्लाबोल, वाद चिघळणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










