Share

“सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू..”; नितेश राणेंचा हल्लाबोल, वाद चिघळणार?

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! सलमान खानच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवरून केला मोठा दावा, वाचा सविस्तर बातमी.

Published On: 

Nitesh Rane Attack: 'सलमान उद्धव पेक्षा जास्त हिंदू'! राणेंचा हल्लाबोल

राजकारणात कधी कोणाची तुलना कोणाशी होईल सांगता येत नाही. आता भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चक्क बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानची तुलना उद्धव ठाकरेंशी केली आहे. “उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू आहे,” असं खळबळजनक विधान राणेंनी केलं असून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. सलमानच्या एका कृतीवरून राणेंनी ठाकरेंना लक्ष्य केलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत अभिनेता सलमान खानने (Salman Khan) हजेरी लावली होती. याच मुद्द्याचा धागा पकडत नितेश राणे पत्रकारांशी बोलताना आक्रमक झाले. ते म्हणाले, “सलमान खानने सरसंघचालकांच्या कार्यक्रमात किमान उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली. पण उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर आपल्या वडिलांना, बाळासाहेब ठाकरेंना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणण्याची हिंमत दाखवतील का?” उद्धव ठाकरेंना आता ते खरंच हिंदू आहेत की नाही, हे तपासावं लागेल, असा शेलक्या शब्दांत राणेंनी प्रहार केला.

Nitesh Rane Attack On Uddhav Thackeray

राज ठाकरेंनाही थेट सवाल दुसरीकडे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भाषेसाठी आंदोलन हा आजार’ असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला होता. यावरही नितेश राणेंनी पलटवार केला. ते म्हणाले, “राज ठाकरेंनी कधी मदरशातील मौलवीला अजान मराठीत द्या, असं सांगितलं का?” मोहन भागवतांच्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचा दावा करत, राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच संघाची बाजू सावरली. बंगळुरूमध्ये जाऊन भागवतांनी इंग्रजीत भाषण केल्याचं उदाहरण देत, राणेंनी राज ठाकरेंना चुकीची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही