Share

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; म्हाडा देणार हक्काचं घर! मार्चमध्ये ‘इतक्या’ घरांची सोडत

पुणेकरांसाठी गुड न्यूज! मार्च महिन्यात म्हाडाकडून ३००० घरांची सोडत जाहीर, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मोठी घोषणा.

Published On: 

MHADA Pune Lottery 2026: मार्चमध्ये ३००० घरांची लॉटरी!

पुण्यात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहताय? पण गगनाला भिडलेले फ्लॅटचे भाव ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकते का? जर उत्तर ‘हो’ असेल, तर आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण सर्वसामान्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी म्हाडा (MHADA) पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पुणे म्हाडाचे (MHADA Pune Lottery 2026) सभापती शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी घराच्या शोधात असलेल्यांसाठी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. येत्या मार्च महिन्यात पुणे मंडळातर्फे तब्बल ३००० घरांची सोडत (Lottery) काढण्यात येणार आहे!

मंगळवारी पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात ४१८६ घरांसाठी संगणकीय सोडत पार पडली. या सोडतीला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा होता. ४ हजार घरांसाठी तब्बल २ लाख १५ हजारांहून अधिक अर्ज आले होते. लोकांचा हा प्रचंड उत्साह पाहून आणि म्हाडावरील विश्वास पाहून आढळराव पाटील यांनी लगेचच मार्चमधील सोडतीची घोषणा केली. त्यामुळे ज्यांचा नंबर या लॉटरीत लागला नाही, त्यांना आता मार्चमध्ये पुन्हा नशीब अजमवण्याची संधी मिळणार आहे.

MHADA Pune Lottery 2026

शिरूरमध्ये ५७४ सदनिका आणि खराबवाडीत व्यापारी गाळे बांधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय ताथवडे येथील फेज-१ पूर्ण झाला असून फेज-२ मधील ७५० निवासी गाळेही लवकरच सोडतीत येतील. म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदरमध्येही गृहनिर्माण प्रकल्प जोरात सुरू आहेत.

यावेळी बोलताना आढळराव पाटील यांनी बिल्डरांच्या मनमानीलाही चाप लावला. २० टक्के सर्वसमावेशक योजनेत जर बिल्डरने वाढीव शुल्काची मागणी केली, तर थेट तक्रार करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. चंदनगर-खराडी येथील १५ गुंठे जमिनीवरील अतिक्रमण हटवून तिथेही सर्वसामान्यांसाठी घरे उभारली जाणार आहेत. म्हाडाचा हा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही एजंटच्या भुलथापांना बळी पडू नका, असं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही