📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

“मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही”, रिंकू राजगुरूने रिलेशनशिपवर बोलताना थेट सांगितलं

रिंकू राजगुरूने लग्नाबद्दल केलं मोठं विधान, ‘बॉयफ्रेंड नको, डायरेक्ट नवरा हवा’, सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा.

Published On: 

Rinku Rajguru Marriage: रिंकूचं लग्नावर मोठं विधान!

🕒 1 min read

‘सैराट’ मधल्या आर्चीने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं, पण हिच्या आयुष्यातला ‘परश्या’ नक्की कोण? हा प्रश्न आजही तिच्या चाहत्यांना सतावतोय. अनेकदा रिंकूचं नाव वेगवेगळ्या मुलांशी जोडलं जातं, पण आता खुद्द रिंकूनेच (Rinku Rajguru) यावर असं काही उत्तर दिलंय की पोरांची झोप उडाली आहे. लग्नाच्या विषयावर रिंकूने थेट सिक्सरच मारलाय!

रिंकू सध्या तिच्या आगामी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Maade Teen) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान ‘भाडीपा’च्या (BhaDiPa) एका कार्यक्रमात गप्पा मारताना रिंकूचा तोच जुना ‘डॅशिंग’ अंदाज पाहायला मिळाला. रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलताना तिने थेट सांगितलं, “मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही, मला डायरेक्ट नवरा पाहिजे.” तिचा हा बिंधास्त व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru Marriage

कार्यक्रमात रिंकूने तिच्या डोळ्यांबद्दलही मजेशीर टिपणी केली. ती म्हणाली, “माझे डोळे खूप खतरनाक आहेत, डोळ्यात बघू नकोस, प्रेमात पडशील. भल्या भल्यांची वाट लागलीय.” अर्थात, हा कार्यक्रम गमतीशीर किस्से सांगण्याचा होता, त्यामुळे यातली गंमत किती आणि सत्य किती हे रिंकूलाच ठाऊक! पण तिने सेटवर सर्वांसाठी स्वयंपाक केल्याचा आणि ती किती ‘गुणी’ आहे, हे सांगायला ती विसरली नाही.

याआधी रिंकूचं नाव तिचा सहकलाकार आकाश ठोसर (Akash Thosar) आणि कोल्हापूरचे कृष्णाराज महाडिक यांच्याशी जोडलं गेलं होतं. पण, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत,” असं सांगत तिने या अफवांना (Rumors) पूर्णविराम दिला होता. आता मात्र तिला ‘डायरेक्ट नवरा’ हवा असल्याचं सांगितल्याने, रिंकू लवकरच लग्नाचा विचार करतेय की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!