🕒 1 min read
लग्नसराईच्या तोंडावर दागिने खरेदीचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्या खिशाला मोठा दिलासा देणारी ठरू शकते. गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या (Gold Rate Today) दरात जी तुफान तेजी पाहायला मिळत होती, त्याला आता मोठा ‘ब्रेक’ लागला आहे. मंगळवारी सकाळीच बाजारात मोठी उलथापालथ झाली आणि चांदीचे दर थेट ११,००० रुपयांनी कोसळले! सोन्याच्या भावातही मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गुंतवणूकदारांनी अचानक नफा वसुलीचा (Profit Booking) सपाटा लावल्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) त्याचे पडसाद उमटले. एप्रिल वायद्याचे सोन्याचे दर तब्बल १.६ टक्क्यांनी म्हणजेच २,५०० रुपयांनी खाली येत १,५५,५४६ रुपयांवर स्थिरावले आहेत. मात्र, खरी खळबळ चांदीने (Silver Price Drop) उडवली आहे. चांदीच्या वायद्यात ४ टक्क्यांची मोठी घसरण झाली असून, दर २,५१,५४४ रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीने काही काळापूर्वी ४ लाख २० हजारांचा विक्रमी टप्पा गाठला होता, त्या तुलनेत आता चांदी १ लाख ७० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Gold Silver Price Drop
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरने पुन्हा डोकं वर काढल्याने सोन्याची चमक फिकी पडली आहे. डॉलर निर्देशांक ९६.८२ वरून ९७.०१ वर पोहोचला आहे. यामुळे जागतिक बाजारात सोनं ५००० डॉलर प्रति औंसच्या खाली घसरलं आहे. जानेवारीच्या उच्चांकाच्या तुलनेत सोन्यात १० टक्क्यांची घट झाली आहे. अमेरिकेतील रोजगार आणि महागाईची आकडेवारी येण्याआधीच गुंतवणूकदार सावध झाल्याचे हे संकेत आहेत.
२४ कॅरेट सोने (शुद्ध) : १,५४,८८० रुपये प्रति तोळा
२२ कॅरेट सोने (दागिन्यांसाठी) : १,५१,१६० रुपये प्रति तोळा
१८ कॅरेट सोने : १,२५,४५० रुपये प्रति तोळा
१४ कॅरेट सोने : ९९,९०० रुपये प्रति तोळा
दागिने प्रेमींसाठी ही ‘संधी’ असली तरी, बाजार अजून किती खाली येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- BCCI चा ‘गुलिगत’ धोका; रोहित-विराटचं डिमोशन, शुभमन गिल मालामाल, तर ‘हे’ 5 दिग्गज बाहेर!
- शिफारशीसाठी मंत्र्याचा फोन? प्रसिद्ध गायकाने थेट नंबर केला ब्लॉक; म्हणाला ‘अशा लोकांबद्दल मला माझ्या मनात….’
- झापूक झुपूक सुरज चव्हाण आता ‘इंडियन जस्टिन बीबर’? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











