Share

सोनं खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा; २४ तासांत सोन्या-चांदीचे दर गडगडले, ग्राहकांना मोठा दिलासा

सोन्या-चांदीच्या सतत वाढणाऱ्या दराला अखेर ब्रेक लागला असून, जळगाव सराफा बाजारात सोन्यात ३ हजार तर चांदीत ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

Published On: 

Gold Silver Price Today Drop In Jalgaon Market

तुम्हीही सोने-चांदीचे दागिने खरेदी (Gold Silver Price) करण्याचा विचार करताय? तर मग तुमच्यासाठी खरंच एक दिलासादायक बातमी आहे. गेले काही दिवस सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागलाय.

सोन्या-चांदीच्या दरात आता थेट मोठी घसरण पाहायला मिळतेय. जळगाव सराफा बाजारात गेल्या चोवीस तासांत सोन्याचे दर तब्बल तीन हजार रुपयांनी खाली आले आहेत.

Gold Silver Price Today

आधी १ लाख ६३ हजारांवर असलेलं सोनं आता थेट १ लाख ६० हजारांवर आलंय. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी म्हणजे पाच हजार रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे २ लाख ५० हजारांची चांदी आता २ लाख ४५ हजारांवर आलीय. हे दोन्ही दर विना जीएसटी आहेत.

दिल्ली सराफा बाजारातही बुधवारी सोन्याचे दर ६०० रुपयांनी घसरून १ लाख ६६ हजार ५०० रुपयांवर आले. तर चांदीमध्ये किरकोळ ५०० रुपयांची वाढ होऊन ती २ लाख ५० हजार ५०० रुपयांवर गेली आहे.

सोन्याचे दर असे अचानक का पडले? तर, अमेरिकेतील वैयक्तिक उपभोग खर्च (PCE) निर्देशांक जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. थोडक्यात सांगायचं तर, महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच… गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसा काढून तो इतरत्र गुंतवल्याने हे दर गडगडले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही