Share

‘मी भाजपची कठपुतळी नाही’; कंगना राणौतचं पक्षाला धक्का देणारं मोठं विधान

कंगना राणौतने ‘मी भाजपची कठपुतळी नाही’ म्हणत पक्ष, तिकीट आणि राजकीय भवितव्यावर मोठं विधान केलं.

Published On: 

Kangana Ranaut BJP statement

Kangana Ranaut : भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) पक्षाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ‘मी काही भाजपची कठपुतळी नाही’ असं म्हणत कंगनाने आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तरी फरक पडत नाही, असंही कंगनाने बिनधास्तपणे सांगितलं.

“मी काही भाजपची (BJP) कठपुतळी नाही आहे. कदाचित उद्या पक्ष माझी साथ देणार नाही. माझ्या बाजूने उभा राहणार नाही, उद्या मला लोकसभेचं तिकिट (Loksabha Ticket) नाही मिळालं तर काही फरक पडत नाही. करण्यासारखं बरंच काही आहे. मी आजही अनेक दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे.” असे बिनधास्त आणि रोखठोक विधान कंगना राणौतने केलं आहे.

Kangana Ranaut BJP statement

तुम्ही जी काही विधानं करता ती भाजपची अधिकृत मते असतात का? असा सवाल एका मुलाखतीत कंगनाला करण्यात आला. त्यावर कंगना राणौत म्हणाली की, असं नाही की मी पक्षाच्या भूमिकेपासून दूर जाते आहे. पण मला वाटतं जेव्हा आजूबाजूला मोठा गदारोळ उठतो, तेव्हा तुम्हाला ओरडण्याची गरज असते. मी अनेकदा रोखठोक आणि बिनधास्त बोलते. पण मी जाणूनबुजून असं करत नाही. त्यामुळे एवढं लक्षात घ्या, मी काही पपेट नाही आहे.”

“भाजप आज माझ्यासोबत आहे, उद्या असेल, नसेल. मी गेल्या दोन वर्षापासून संसदेची सदस्य आहे. 20 वर्षांपासून मी कलाकार आहे. माझं स्वत:चं अस्तित्व आहे. जर मी उभी राहिली तर 20 मीडियावाले येतील आणि माझं म्हणणं ऐकतील,” असं कंगना म्हणाली.

मी नेहमीच आजही स्वत:ला व्यक्तिगतरित्या वेगळं समजत नाही. माझे विचार हे माझे आहेत. माझी विचारधाराही माझी वैयक्तिक आहे. ती अचानक गायब होणार नाही. पक्षासोबत माझी अलाईन्मेंट चांगली आहे. मला पूट ऑन करण्याची गरज भासत नाही. हे मात्र खरंय की कधी कधी इकडे तिकडे होतं. त्यांना माझं म्हणणं खटकत असावं. पण मी अजून नवीन आहे आणि या गोष्टी समजून घेत आहे. शिकत आहे, असं मत कंगनाने स्पष्ट केलं.

कंगनाला पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला. येत्या पाच-दहा वर्षात तू कोणत्या मोठ्या संवैधानिक पदावर असशील? की परत अभिनयाकडे वळणार? त्यावर ती म्हणाली, याचं उत्तर देणं कठिण आहे. आजच्या काळात जेवढी अनिश्चितता आहे, हे पाहता काहीच सांगता येत नाही.”

पुढच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळण्याची भीती वाटतेय? असं तिला विचारण्यात आलं. यावर तिने उत्तर दिले की, “तिकीट नाही मिळालं म्हणजे माझं अस्तित्व संपुष्टात येईल ही भीती म्हणता येणार नाही. मी एक अभिनेत्री आहे. फिल्ममेकर आहे. लेखिका आहे. माझं माझ्या कामावर प्रेम आहे. मी अनेक दिग्दर्शकांची आवडती नटी आहे. त्यातील अनेकजण माझी वाटही पाहत आहेत. तू इंडस्ट्री का सोडली? असं ते मला विचारत असतात. आयुष्यात करण्यासारखं बरंच काही आहे, असं देखील तिने स्पष्टपणे सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही