Share

‘सस्ती कॉपी’ आणि संस्कारांवरून वाद, अखेर तापसी पन्नूने सुनावले खडेबोल

कंगना रणौतने केलेल्या ‘सस्ती कॉपी’ आणि संस्कारांवरील टीकेवर तापसी पन्नूने मौन सोडले आहे. तिने हा वाद मीडियामुळेच जिवंत असल्याचा थेट आरोप केला आहे.

Published On: 

Taapsee Pannu Kangana Ranaut actresses talking about upbringing and sasti copy remark

Taapsee Pannu On Kangana Ranaut: बॉलिवूडमधील दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ‘संस्कार’ आणि ‘सस्ती कॉपी’ यावरून शाब्दिक युद्ध जुंपले आहे. तापसी पन्नू आणि कंगना रणौत यांच्यातील जुना वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नेपोटिझमच्या (घराणेशाही) मुद्दयावरून अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण आता या वादावर तापसीने मौन सोडलं आहे. तिने कंगनाला उत्तर देण्याऐवजी थेट मीडियालाच फैलावर घेतलंय.

Taapsee Pannu On Kangana: तापसीचा मीडियालाच सवाल

आगामी ‘गांधारी’ या थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तापसीला कंगनासोबतच्या वादाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ती भडकली नाही, पण तिने एक अत्यंत थेट आणि सडेतोड सवाल केला.

“तुम्ही लोक हा विषय संपू का देत नाही?” असा उद्विग्न सवाल तापसीने केला. तिच्या मते, जोपर्यंत मीडिया या दोघींना एकमेकींबद्दल प्रश्न विचारणं थांबवत नाही, तोपर्यंत हा वाद असाच धुमसत राहील.

ती म्हणाली, “तुम्हा सर्वांना हे सगळं पाहायला खूप मजा येते. म्हणूनच तुम्ही वारंवार तेच तेच प्रश्न विचारता. जर तुम्ही असे प्रश्न विचारणं बंद केलं, तर हा वाद कधीच संपुष्टात आला असता.” मीडियानेच हा वाद मुद्दाम जिवंत ठेवल्याचा आरोप तिने केला आहे.

या नव्या वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली?

काही दिवसांपूर्वी तापसीने एका मुलाखतीत कंगनासोबतच्या समीकरणावर भाष्य केलं होतं. “आम्ही दोघी कधीच एकमेकींना भेटलेलो नाही. हे वाद सुरू होण्यापूर्वीही नाही आणि आताही नाही,” असं ती म्हणाली होती.

पण पुढे ती असंही म्हणाली होती की, “माझं तिच्याबद्दलचं मत हे माझ्या संस्कारांमधून आणि विचार करण्याच्या पद्धतीतून येतं. तिचं मत तिच्या संस्कारांवर अवलंबून आहे. कोण कुठून येतं, हे ठरवण्यासाठी एवढं पुरेसं आहे.” हेच वाक्य कंगनाला चांगलंच झोंबलं.

या विधानानंतर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवरून तापसीवर जोरदार पलटवार केला. तिने तापसीला पुन्हा एकदा ‘सस्ती कॉपी’ (Sasti copy) म्हटलं. इतकंच नाही, तर तिच्या आगामी चित्रपटाला ‘बी-ग्रेड’ ठरवत डिवचलं.

कंगना तिथेच थांबली नाही. तिने तापसीच्या पालकांनाही या वादात ओढलं. “माझ्या आई-वडिलांनी जसं ओरिजिनल व्यक्तिमत्त्व घडवलं, तसं तुमच्या आई-वडिलांना का जमलं नाही? फक्त एक स्वस्त कॉपी का बनवली?” असा बोचरा सवाल तिने तापसीच्या आई-वडिलांना उद्देशून केला होता.

सध्या तापसी या सर्व गदारोळापासून दूर तिच्या ‘गांधारी’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. देवाशिष मखिजा यांनी या ॲक्शन-पॅक्ड चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, कनिका धिल्लन या लेखिका आणि निर्मात्या आहेत.

आता तापसीने मीडियालाच खडेबोल सुनावल्याने, हा वाद खरोखरच थांबणार का? की कंगनाकडून पुन्हा एखादी संतप्त प्रतिक्रिया येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही