बॉलिवूडमध्ये सध्या शाब्दिक युद्धाचा नवा भडका उडालाय. विषय जुनाच आहे, पण यावेळी सगळ्या मर्यादा पार झाल्या आहेत. होय, कंगना रनौतने पुन्हा एकदा तापसी पन्नूवर जोरदार आगपाखड केलीय.
एका ताज्या मुलाखतीतील तापसीच्या वक्तव्यामुळे कंगना प्रचंड संतापली आहे. तिने तापसीला थेट ‘स्वस्त कॉपी’ तर म्हटलंच, शिवाय संतापाच्या भरात तिच्या आई-वडिलांनाही या वादात ओढलं आहे.
Kangana Ranaut vs Taapsee: कंगना आई-वडिलांवरून घसरली
‘जेन झी’ पिढीला ‘गटर छाप’ म्हणल्याने कंगना आधीच ट्रोल होत होती. त्यात आता तापसीच्या ‘गांधारी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळच्या एका विधानाने आगीत तेल ओतलं. एका कार्यक्रमात कंगनासोबतच्या वादावर तापसीला प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर तापसीने अतिशय संयत उत्तर दिलं. ती म्हणाली, “आम्ही कधीच भेटलो नाही. एखाद्याबद्दलचं आपलं मत हे आपलं संगोपन आणि दृष्टिकोन दाखवत असतं. कोण कुठून येतं, हे समजायला तेवढं पुरेसं आहे.”
बस्स! तापसीचं हेच वक्तव्य कंगनाला चांगलंच खटकलं. तिने लगेच इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट लिहीत बेशरमपणाच्या मर्यादा पार झाल्याचं म्हटलं. “आज तिने माझ्या आई-वडिलांची आणि संस्कारांची खिल्ली उडवली,” असा आरोप कंगनाने केला.
रागाच्या भरात ती पुढे म्हणाली, “प्रत्येक आई-वडील मुलांना चांगलं घडवतात. पण मला तिच्या आई-वडिलांना आज विचारावंसं वाटतं, त्यांनी माझ्यासारख्या ‘ओरिजिनल’ व्यक्तीला जन्म का दिला नाही? ही स्वस्त कॉपी का जन्माला घातली? तुमच्या प्रयत्नांची कीव येते.”
थोडक्यात सांगायचं तर, २०१९ मध्ये ट्रेलरच्या कौतुकावरून सुरू झालेला हा ‘स्वस्त कॉपी’ आणि ‘बी-ग्रेड’ अभिनेत्रीचा वाद आता अत्यंत खालच्या पातळीवर गेलाय. कंगनाच्या या जळजळीत टीकेवर आता तापसी काय उत्तर देते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अनर्थ; महाकाय गणेशमूर्ती कोसळून दोघांचा करुण अंत
- राहुल गांधींचा पुण्यातून मोदी सरकारवर थेट निशाणा; मुलींच्या शिव्यांवरून सांगितला ‘तो’ किस्सा
- लाडकी बहीण योजनेचा अजब कारभार; अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात गेले तब्बल ९,६०५ कोटी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











