Share

भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अनर्थ; महाकाय गणेशमूर्ती कोसळून दोघांचा करुण अंत

मुंबईत भुलेश्वरचा राजाच्या आगमन मिरवणुकीत २२ फुटांची गणेशमूर्ती कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन लहान मुलींसह ५ जण जखमी झाले आहेत.

Published On: 

Bhuleshwar Cha Raja 22 feet idol accident during arrival in Mumbai

‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत एक भीषण दुर्घटना घडली. एका क्षणात सगळा आनंद हिरावून घेतला गेला. शनिवारी रात्रीची ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना आहे. भायखळ्यावरून भुलेश्वरकडे बाप्पाची मिरवणूक मोठ्या थाटात निघाली होती. पण मंडळाच्या मंडपाच्या अगदी जवळ, अवघ्या ५० मीटर अंतरावर असतानाच २२ फुटांची मूर्ती अचानक कोसळली.

Bhuleshwar Cha Raja: बाप्पाच्या आगमनात काळाचा घाला

ही मूर्ती प्रचंड मोठी होती. ती कोसळताच अनेक भाविक त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. संकेत नेवशे (वय ३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) अशी या मृत तरुणांची नावे आहेत.

दुसरीकडे, या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्य वेगाने सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या सर्व जखमींवर जी.टी., रिलायन्स, सैफी आणि जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूर्ती नेमकी का कोसळली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही