मुंबई : पोलिसांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी राज्यभरातील ओबीसी समाजाचे सदस्य एकत्र येणार होते. मात्र, आझाद मैदान (Azad Maidan) पोलिसांनी या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यास नकार दिला आहे. (OBC Protest)
मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने या आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज सादर करण्यात आला होता, परंतु पोलिसांनी विविध कारणे देत ही विनंती फेटाळून लावली.
OBC protest at Azad Maidan Mumbai
मुंबई पोलिसांनी दिलेल्या कारणांपैकी एक म्हणजे, या आंदोलनामुळे आझाद मैदानालगतच्या रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, तसेच, मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, अशी भीतीही पोलिसांनी व्यक्त केली.
याव्यतिरिक्त, त्या परिसरातील संभाव्य गर्दी, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि नागरिकांना होणारा त्रास यांसारख्या बाबींचा विचार करूनच परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ओबीसी समाजाचे सदस्य १ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता आंदोलकांची पुढील चाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते काय प्रतिक्रिया देतात आणि आंदोलनासाठी कोणती पुढील दिशा ठरवली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पाटस ते मुंबई अशी भव्य रॅली काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली.
यावर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, “मागील वर्षी 2 सप्टेंबर रोजी काढलेला ओबीसी आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय रद्द करणार का? तसेच सामाजिक मागास ठरवून मराठा समाजातील कुणबी घटकाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया रद्द करणार का? या दोन्ही मागण्या मान्य करण्याची तयारी असेल, तरच आम्हाला भेटायला या.” असे विधान त्यांनी केले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी टीम तयार; 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर
- कोट्यवधींचा दंड, कारवाई मात्र नावापुरती! ७३ कोटींच्या वसुलीसाठी शासनाच्या हाती फक्त ५७ लाखांची मालमत्ता? महसूल विभागाचा अजब कारभार
- रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाला फटका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











