नांदेड, २५ नोव्हेंबर: राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत तीव्र शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने आणि समाजाकडून पुरेशी साथ मिळत नसल्याने त्यांनी मोठी हतबलता व्यक्त केली. ‘आता निराश झालो असून उडी मारावी, जीवन संपवावं वाटतं,’ असे धक्कादायक विधान त्यांनी केले.
आरक्षणाच्या लढ्याला लोकांची साथ मिळत नसल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हाके यांनी ही उद्विग्नता व्यक्त केली. राज्यकर्त्यांनी आणि विशेषतः भाजपने ओबीसींचे आरक्षण संपवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. समाजाला सातत्याने जागृत करण्याचा प्रयत्न करूनही आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
राज्य मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे ०८ मंत्री आहेत, तरीही या प्रश्नावर कोणीही ठामपणे बोलण्यास तयार नसल्याचे हाके म्हणाले. ‘किती सांगू ओबीसींना, किती समजावून सांगू मुख्यमंत्र्यांना? कोणीही बोलायला तयार नाही. मी किती ओरडू?’ असा सवाल करत त्यांनी मंत्र्यांच्या मौनावर संताप व्यक्त केला.
ज्या नेत्याने स्वतःचा डीएनए ओबीसी असल्याचे सांगितले, त्याच नेत्याने हे आरक्षण संपवल्याची टीका त्यांनी सत्ताधारी नेतृत्वावर केली. ‘मी ओबीसींसाठी रात्रंदिवस लढतोय, श्वाससुद्धा ओबीसी म्हणून घेतोय. त्या माणसाने आता काय करायचं?’ असा संतप्त प्रश्न उपस्थित करत सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट; एसआयटीचे पथक अंतरवालीत, जरांगेंकडून रामदास कदमांच्या चौकशीची मागणी
- मंदार किवळेवर कोयत्याने हल्ला, मात्र गोळीबार नाही; पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
- ‘वैभव सूर्यवंशी १५ वर्षांचा नाही’: माजी पाकिस्तानी क्रिकेटर तन्वीर अहमदने फलंदाजाच्या वयावर उपस्थित केले प्रश्न








