५० टक्के आरक्षण मर्यादेमुळे ओबीसींना मोठा धक्का; ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षणाच्या आदेशामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसींच्या ५ जागा कमी होण्याची शक्यता असून राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Published On: 

OBC reservation issue in Maharashtra Supreme Court decision Zilla Parishad elections

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) मोठा फटका बसला आहे. या निर्णयानुसार निवडणुका झाल्यास एकट्या नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींच्या ५ जागा कमी होणार आहेत. या घडामोडींमुळे ओबीसी नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. याआधी परिषदेत ३३ जागा आरक्षित होत्या. यात अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातीसाठी ८ आणि ओबीसींसाठी १५ जागांचा समावेश होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठेवल्यास केवळ २८ जागा आरक्षित राहतील आणि उर्वरित २९ जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील.

अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणात कोणताही बदल होणार नसल्याने, या मर्यादेचा थेट फटका ओबीसी वर्गाला बसेल. त्यामुळे ओबीसींच्या १५ पैकी ५ जागा कमी होऊन त्या खुल्या प्रवर्गात वर्ग केल्या जाण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

कमी होणाऱ्या या जागांमुळे महिला आरक्षणाची सोडत कशी काढली जाणार, यावरही राजकीय पक्षांचे लक्ष आहे. आरक्षण नव्याने निश्चित करताना केवळ ५ जागांसाठी सोडत काढली जाईल की सर्व १५ ओबीसी जागांसाठी प्रक्रिया राबवली जाईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यातील रखडलेल्या २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या महिन्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे.

ज्या ठिकाणी अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत, तिथे त्या घेतल्या जाऊ शकतात. मात्र, या निवडणुकांची प्रक्रिया आणि अंतिम निकाल हे ओबीसी आरक्षण खटल्याच्या सर्वोच्च न्यायालयातील अंतिम निर्णयावरच अवलंबून असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही