प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: दिवाळीच्या तोंडावर १ नोव्हेंबर रोजी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २८२० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
या नव्या दरवाढीनंतर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा भाव २७६४ रुपये, तर घरगुती सिलिंडरचा भाव ९४१.५ रुपये आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर २९९४.५० रुपयांवर पोहोचले आहेत. ऑक्टोबर महिन्यात चेन्नईत हा दर २९८३ रुपये होता, म्हणजेच त्यात ११.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर, चेन्नईत घरगुती गॅससाठी ९५७.५ रुपये मोजावे लागत आहेत.
अहमदाबादमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर २८३१.५० रुपयांवरून वाढून आता २८४२ रुपये झाला आहे, तर येथील घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. शिलाँगमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत १००७.५० रुपये असून व्यावसायिक सिलिंडरचा भाव ३०९१ रुपये झाला आहे. व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग व्यावसायिकांना बसणार असून, परिणामी खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.
२०१४ ते २०२६ या काळात व्यावसायिक सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. १२ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत १,४४९ रुपये निश्चित केली होती. मात्र, नोव्हेंबर २०२६ पर्यंत व्यावसायिक गॅसच्या दरांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. होर्मुझच्या आखातात होणारे हल्ले आणि काही तेल प्रकल्पांना टार्गेट केल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढल्यास गॅसच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्…
- महिलेच्या घरात घुसून विनयभंग अन् मारहाण; वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलवर १४ कलमांखाली गुन्हा दाखल
- रेल्वेच्या ॲडव्हान्स तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल; आता १२० ऐवजी केवळ ‘इतक्या’ दिवस आधीच करता येणार बुकिंग
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








