अर्नब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन; हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना इशारा

अर्नब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, हवामान विभागाने मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

Published On: 

Rain forecast and weather change in Maharashtra due to Arnab cyclone

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: पावसाने पाठ फिरवलेल्या महाराष्ट्रात आता अर्नब चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Maharashtra Rain) राज्याला पावसाचा मोठा इशारा दिला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून छत्तीसगड आणि पूर्व-मध्य प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यावरही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, चक्रीवादळामुळे राज्यात थंडीही वाढल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील १० पेक्षा अधिक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्याच्या विविध भागात रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून, मुंबईतील अनेक ठिकाणी चांगला पाऊस बरसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान ढगाळ राहील.

राज्यातील काही विशिष्ट जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही