प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या वातावरणीय बदलांमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, आगामी २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचे प्रमाण नेमके किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सध्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, पुढील चार दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. २६ ते २८ ऑक्टोबर या काळात बंगालच्या खाडीत वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर इतका राहू शकतो. ही स्थिती कायम राहिल्यास हा वेग ताशी ९० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळाच्या तीव्रतेवर आणि वाटचालीवरच महाराष्ट्रातील पावसाचे भवितव्य ठरणार आहे.
या बदलाचा परिणाम केवळ महाराष्ट्रावरच नाही, तर देशातील इतर सहा राज्यांवरही होणार आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशचा समावेश असून, ईशान्येकडील राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राजधानी पणजीसह गोव्यातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अशातच रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना एका चांगल्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पाऊस बरसल्यास पाणीटंचाईतून काहीशी सुटका होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे आगामी काळात हे चक्रीवादळ नेमकी काय स्थिती निर्माण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑगस्टपासून सोन्याच्या दरात तब्बल २३ हजारांची घसरण; चांदीही ५६ हजारांनी स्वस्त
- शेअर बाजाराच्या टिप्स देणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स ठरताहेत धोक्याचे! SEBI चा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा
- म्हाडाच्या ८१४ सदनिका आणि भूखंड हडप प्रकरण; २३ बिल्डरांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
Quick Answers
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२६ ते २८ ऑक्टोबर या काळात बंगालच्या खाडीत वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर राहू शकतो आणि ही स्थिती कायम राहिल्यास तो ताशी ९० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
या बदलाचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांवर तसेच ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







