Maharashtra Rain, 25 ऑक्टोबर: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या काही भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस सायंकाळच्या सत्रात मेघगर्जनेसह आलेल्या वादळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात पाऊस आल्याने सह्याद्रीपट्ट्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांमधील उभी भातशेती आडवी झाली आहे. कापलेले भातही भिजून खराब झाल्याने त्याला कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गच्या काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून हवेत मात्र गारवा निर्माण झाला आहे. पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्रालाही बसला आहे. कोल्हापूर शहरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. येथील राजारामपुरीतल्या नव्या गल्लीत एका चारचाकी आणि दुचाकी वाहनावर नारळाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत वाहनांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एकीकडे पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपल्याने आणि पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशातच एका बाजूला उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे कोसळणारा अचानक पाऊस, अशा दुहेरी संकटाचा सामना आता शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. त्यामुळे आगामी दोन आठवड्यांत देशाच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, महाराष्ट्रातही २७, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी काही भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या पट्ट्यात हवामान उष्ण आणि दमट राहणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी व छत्री सोबत बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑगस्टपासून सोन्याच्या दरात तब्बल २३ हजारांची घसरण; चांदीही ५६ हजारांनी स्वस्त
- शेअर बाजाराच्या टिप्स देणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स ठरताहेत धोक्याचे! SEBI चा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा
- म्हाडाच्या ८१४ सदनिका आणि भूखंड हडप प्रकरण; २३ बिल्डरांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
Quick Answers
ऐन भातकापणीच्या हंगामात आलेल्या पावसामुळे सह्याद्रीपट्ट्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांमधील उभी भातशेती आडवी झाली आहे.
कोल्हापूरमधील राजारामपुरीतल्या नव्या गल्लीत एका चारचाकी आणि दुचाकी वाहनावर नारळाचे झाड कोसळले. यात वाहनांचे नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा 'अलर्ट' देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात २७, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी काही भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







