अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील ५ दिवस धोक्याचे; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा इशारा, तर उत्तर भारतात कोरडे वातावरण.

Published On: 

Rain clouds representing IMD heavy rain alert due to low pressure

प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) अनेक राज्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला असून, पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे देशात मान्सूनने दडी मारल्याने मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुढील २४ तासांत अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रणालीमुळे येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल. पुढील पाच दिवस या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे. तसेच, वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

दक्षिण भारतात पावसाचा इशारा असला तरी, उत्तर भारतात या काळात हवामान पूर्णपणे कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये २२ ते २५ ऑक्टोबर, तर उत्तराखंडमध्ये २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील काही भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा विचार करता, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्याचा काही भाग आणि सातारा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. राज्याच्या उर्वरित भागात मंगळवारी हवामान कोरडे राहील. दरम्यान, सोमवारी पुण्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही