IMD Weather Alert: देशातील १० राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर महाराष्ट्रात वाढणार थंडी

हवामान विभागाने देशातील १० राज्यांना पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे.

Published On: 

IMD weather alert map showing heavy rain forecast in India

प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: नोव्हेंबर महिना सरत असून डिसेंबरची सुरुवात होत असताना देशभरात हवामानाचे संमिश्र स्वरूप पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशातील १० राज्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसह एकूण दहा राज्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

दुसरीकडे, उत्तर भारतात पुढील दोन ते तीन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सरासरी तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये गारठा चांगलाच वाढणार आहे.

महाराष्ट्रातही थंडीची चाहूल लागली असून उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही गारठा वाढत असून, बहुतांश भागात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात राज्यात थंडी आणखी वाढेल. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत पावसानेही हजेरी लावली आहे.

एकीकडे राज्यात थंडी वाढत असताना, गोंदिया जिल्ह्यात मात्र सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे वातावरण आहे. कालपासून जिल्ह्यात सतत रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गोंदियातील धान पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही