प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: मुंबई पोलिसांच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना देवेन भारती (Deven Bharati) यांनी २०१९ नंतरच्या काळात पोलिसांच्या सुविधा आणि तंत्रज्ञानविषयक प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा केला आहे.
भारती यांनी स्पष्ट केले की, २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून अनेक तंत्रज्ञान-आधारित प्रकल्प सुरू करण्यात आले होते. परंतु, २०१९ नंतर (उद्धव ठाकरे यांच्या काळात) या प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याने काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडले, तर काही योजनांसाठी पुन्हा जुन्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. त्यांनी ‘डायल ११२’ प्रकल्पाचे उदाहरण देताना सांगितले की, या अंतर्गत असलेली जीपीएसयुक्त वाहने आणि त्यांच्या लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा त्या काळात थांबवण्यात आली होती.
२०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या सर्व प्रकल्पांना नव्याने गती मिळाली. यातून मुंबई पोलिसांचे अनेक प्रश्न सुटले असून, आज सादर करण्यात आलेले तंत्रज्ञान उपक्रम हे त्याच प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या एमपीआयएएस (MPIAS) या डायनॅमिक आणि स्केलेबल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोलिसांचे सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडले गेले आहेत. या प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. तसेच, जनतेला सीमलेस सेवा मिळण्यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन त्यांचे काम सुकर होईल, असा विश्वास देवेन भारती यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये घडवला इतिहास; शतक झळकावत मोडले ५ मोठे विक्रम
- टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो यात गैर काय? व्हायरल व्हिडिओवर भाजप नेत्याचा सवाल
- ‘तुमचा सल्ला पाळला अन् आमचे पैसे वाचले’, पंतप्रधान मोदींचा सोने खरेदीबाबतच्या आवाहनाचा संदर्भ








