प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: हिवाळा सुरू झाला की थंड हवेमुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी व खरखरीत दिसू लागते. त्वचा सुकल्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटते. या समस्येवर मात करण्यासाठी अनेकदा महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सची खरेदी केली जाते. मात्र, त्याऐवजी घरच्या घरी बदाम आणि दुधाचा वापर करून त्वचेची योग्य काळजी घेता येऊ शकते.
बदामामध्ये असलेले विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या निगेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच, दुधाचा वापर अनेक घरगुती सौंदर्य उपायांमध्ये केला जातो. या दोन्ही पदार्थांपासून तयार होणारे बदामाचे दूध हिवाळ्यात त्वचेला मऊपणा देण्यासाठी आणि त्वचा दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
हा सोपा उपाय करण्यासाठी ४ बदाम आणि ४ चमचे दूध लागते. सर्वप्रथम बदाम पाण्यात भिजत ठेवावेत. ते मऊ झाल्यानंतर त्यांची साल काढून घ्यायची आणि ४ चमचे दुधामध्ये ते बारीक वाटून घ्यायचे. हे मिश्रण एकजीव झाले की त्वचेवर लावण्यासाठी बदामाचे दूध तयार होते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि त्यानंतर कापसाच्या मदतीने हे तयार केलेले बदामाचे दूध चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावे. काही वेळाने किंवा त्वचेला योग्य वाटल्यास ते धुऊन टाकावे. हे मिश्रण नेहमी ताजे तयार करूनच वापरणे चांगले, ते जास्त दिवस साठवून ठेवू नये. हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय असून नियमित काळजी घेतल्यास त्वचा फ्रेश आणि तजेलदार दिसण्यास मदत होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- डायल 112 ते GPS ट्रॅकिंग: उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधांकडे दुर्लक्ष; देवेन भारतींचा दावा
- ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांनाच विचारा’; डीसीसी बँक निवडणुकीच्या वादातून शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
- जिथे पाऊसच पडत नाही तिथे अजितदादांना आणायचं का? आनंदराज आंबेडकरांचे दिवंगत अजित पवारांबाबत असंवेदनशील विधान








