जिथे पाऊसच पडत नाही तिथे अजितदादांना आणायचं का? आनंदराज आंबेडकरांचे दिवंगत अजित पवारांबाबत असंवेदनशील विधान

दुष्काळी परिस्थितीवरून लक्ष्य करताना आनंदराज आंबेडकर यांनी जालन्यात दिवंगत अजित पवारांबाबत असंवेदनशील वक्तव्य केले आहे.

Published On: 

Ajit Pawar

जालना, 22 नोव्हेंबर: जालना येथे पार पडलेल्या रिपब्लिकन सेनेच्या २८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक असंवेदनशील विधान केले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला.

या कार्यक्रमात बोलताना आंबेडकर यांनी, “आपले राज्यकर्ते म्हणतात की पाणी आडवा, पाणी जिरवा. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?” असा उपहासात्मक प्रश्न विचारला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. अजित पवार यांनी पाण्याच्या संदर्भात यापूर्वी केलेल्या विधानाचा आपण केवळ उपरोधिकपणे उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या प्रश्नावर आगामी काळात तालुकानिहाय बैठका घेण्यात येतील, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. तसेच, या बैठकांनंतर दुष्काळाच्या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सद्यस्थितीत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी त्यांच्या युतीची ताकद दाखवून दिली होती. निकालानंतर दलित मतांचे समीकरण साधण्यात ही युती यशस्वी झाल्याचे राजकीय जाणकारांनी स्पष्ट केले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही