अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास; नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप

अजित पवारांचा अपघात झालेल्या विमानातून रोहित पवारांनीही एकत्रित प्रवास केला होता, असा दावा करत भाजप नेते नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केला आहे.

Published On: 

Rohit Pawar and BJP allegations over plane crash

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच भाजप नेते नवनाथ बन यांनी एक मोठा दावा करत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचा अपघात ज्या विमानात झाला, त्याच विमानातून अजितदादा आणि रोहित पवार यांनी एकत्रित प्रवास केला होता, असा खळबळजनक आरोप बन यांनी केला आहे.

नवनाथ बन यांच्या म्हणण्यानुसार, १० डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली ते नागपूर असा हा एकत्रित प्रवास झाला होता. विशेष म्हणजे, या प्रवासादरम्यान व्हीएसआर कंपनीच्या या विमानाचे पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी हेच होते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या अपघातावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. नुकतेच त्यांनी ‘मफलर मॅन’ असा उल्लेख करत, व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना आपण व्हीएसआर कंपनीच्या विमानातून कधीही प्रवास केला नसल्याचे रोहित पवार म्हणाले होते. मात्र, रोहित पवार धांदात खोटे बोलत असून त्यांनी याच विमानातून प्रवास केल्याचा दावा करत नवनाथ बन यांनी हा नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही