फोटो म्हणजे पाठिंबा नव्हे, राजकारण थांबवून शेतकऱ्यांना मदत करा; एकनाथ शिंदेंनी रोहित पवारांना सुनावले

केवळ फोटोवरून आरोप करणे चुकीचे असून विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Published On: 

Eknath Shinde criticizing Rohit Pawar and Uddhav Thackeray

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे किंवा त्याच्या लग्नाला जाणे म्हणजे त्याला पाठिंबा देणे होत नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना सुनावले आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विरोधक केवळ राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.

पुराव्याशिवाय केवळ फोटोंवरून आरोप करणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. बोलणाऱ्यांचेही अनेकांसोबत फोटो असतात, याची आठवण करून देत ते म्हणाले की, एखाद्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे संबंधिताला पाठीशी घालणे असा अर्थ होत नाही. सध्या राजकारण करण्याची वेळ नसून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना किमान एक बिस्किटाचा पुडा तरी द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होणे अपेक्षित असताना, केवळ खुर्ची आणि पदाच्या लालसेपोटी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात शिंदे यांनी केला. जनतेशी खोटे बोलणाऱ्या ठाकरेंना अमित शाह यांना ‘थापाड्या’ म्हणण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे हेच एक नंबरचे खोटे बोलणारे नेते आहेत. खोटे पण रेटून बोलायचे आणि मोदी-शाह यांच्यावर टीका करून मीडियाच्या हेडलाईन्समध्ये राहायचे, अशी त्यांची पद्धत असल्याचे शिंदे म्हणाले. विरोधकांना ‘मोदी फोबिया’ झाला असून त्यांना मोदी आणि अमित शाह यांच्याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. यामुळे त्यांची झोपही उडाली आहे. मात्र, महाराष्ट्र आणि देशातील जनतेला विरोधकांचा हा खोटारडेपणा समजला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही