जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतोच, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा सूचक इशारा

एकनिष्ठ व्यक्तीलाच पदाची संधी मिळते, मात्र जो नडतो त्याला टप्प्यात आल्यावर बरोबर डोक्यावर टाकतो, असा इशारा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात दिला.

Published On: 

Minister Shivendraraje Bhosale warning opponents in Satara

सातारा, 17 नोव्हेंबर: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या राजकीय विरोधकांना एक सूचक इशारा दिला आहे. जो आपल्याला नडतो, तो टप्प्यात आल्यावर त्याला डोक्यावर आपटून बाजूला कसं व्हायचं, हा कुस्तीतला डाव आपण आपल्या वडिलांकडून शिकलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विश्वासू आणि नेहमी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीलाच पदाची लॉटरी लागते, असे ते म्हणाले. काहींना वाटतं की ‘बाबांना काय समजतंय?’, मात्र कोणाला कधी डोक्यावर टाकायचं हे मला अचूक माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले की, इकडे-तिकडे किंवा मधेच कुठेही वळण न घेता, जिथून निघाल तिथून थेट बंगल्यावर या. तुमची निष्ठा असेल तर त्याचे नक्कीच चीज होईल. कुस्तीतील डावपेचांचा संदर्भ देत शिवेंद्रराजे म्हणाले की, एखाद्याला डोक्यावर टाकल्यावरच त्याला ते समजतं, तोपर्यंत त्याला आपण डोक्यावर पडलोय हे काहीच कळत नाही.

आपला हा राजकीय डावपेच स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आज नाही तर महिना, सहा महिने किंवा वर्षभर वाट पाहावी लागली तरी चालेल. पण जो नडतो, तो कधी ना कधी आपल्या टप्प्यात येतोच. त्यावेळी त्याला बरोबर डोक्यावर टाकायचं आणि आपण त्यातून बाहेर पडायचं, हीच शिकवण आपण वडिलांकडून घेतल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही