राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; आईच्या पुस्तक प्रकाशनात सांगितला केंब्रिजमधील किस्सा

सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनात राहुल गांधींनी पहिल्यांदाच आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करत केंब्रिजमधील एका रेस्टॉरंटचा मजेदार किस्सा सांगितला.

Published On: 

Rahul Gandhi FIR case

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या आई सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात एक मोठा खुलासा केला. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना पहिल्यांदाच आपल्या ‘गर्लफ्रेंड’चाही जाहीर उल्लेख केला.

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असतानाची एक आठवण सांगितली. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट ब्रिटनमधील केंब्रिज येथील ‘व्हर्सिटी रेस्टॉरंट’मध्ये झाली होती. आपल्या आई-वडिलांची पहिली भेट नेमकी कुठे झाली होती, हे पाहण्यासाठी अनेक वर्षांनंतर आपण आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन त्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. राहुल यांनी आठवण सांगितली की, त्या रेस्टॉरंटचे पिवळ्या रंगाचे दार त्यांना आजही आठवते. तिथे पोहोचल्यावर एका कर्मचाऱ्याने किती जण आहात, अशी विचारणा करून दोघांना टेबलवर बसवले आणि मेन्यू दिला.

जेव्हा राहुल गांधींनी त्या कर्मचाऱ्याला सांगितले की, ‘माझे आई-वडील पहिल्यांदा याच रेस्टॉरंटमध्ये भेटले होते,’ तेव्हा तो कर्मचारी म्हणाला, “अरे, ते दोघे! मी त्यांना ओळखतो. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात हे मला बरोबर माहीत आहे.” त्यानंतर राहुल यांनी त्याला मेन्यूमधील चांगला पदार्थ कोणता, असे विचारले. त्याने ‘चिकन चॅसर’ हा पदार्थ सुचवला आणि राहुल यांनी दोघांसाठी तेच मागवले. मात्र, त्यांना या पदार्थाची चव अजिबात आवडली नाही. आई-वडिलांना तिथले जेवण खूप आवडायचे, पण आपला अनुभव तसा नव्हता, असे ते विनोदी शैलीत म्हणाले. ‘तुम्हाला प्रेमात पडायचे असेल तर केंब्रिजमधील व्हर्सिटी रेस्टॉरंटमध्ये जा, पण तिथे गेल्यानंतर चिकन चॅसर अजिबात खाऊ नका,’ या त्यांच्या सल्ल्यावर सोनिया गांधींसह उपस्थित सर्वजण खळखळून हसले.

राहुल गांधी यांनी भाषणात गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरू झाली. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना थेट विचारले की, तुम्ही भाषणात ज्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला, ती आता कुठे आहे? यावर राहुल गांधी यांनी अगदी थोडक्यात उत्तर देताना, ‘ती आता माझी एक मैत्रीण आहे,’ असे सांगितले. त्यांनी या महिलेबाबत अधिक कोणतीही वैयक्तिक माहिती दिली नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या राहुल गांधींच्या या मैत्रिणीचीच जोरदार चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही