SRA आरोपांवरून प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांवर पलटवार; अपना घर घोटाळ्याप्रकरणी दिला कारवाईचा इशारा

एसआरए आरोपांवरून पर्यटन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिले असून मीरा-भाईंदरमधील अपना घर घोटाळ्याप्रकरणी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Published On: 

Bike taxi New Rules

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: पर्यटन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांच्या एसआरए प्रकल्पातील आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी राऊत सरकारविरोधात मोठे आरोप करत असून सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हा प्रयत्न अयोग्य असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्ये एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजना सुरू केली, ज्या माध्यमातून अनेक झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळाली आहेत, याची आठवण सरनाईक यांनी करून दिली. कोणताही बिल्डर स्वत:च्या फायद्यासाठी काम करत असला, तरी तो लोकांच्या घरांसाठीही कार्य करतो. त्यामुळे केवळ बिल्डरचे नाव घेऊन सरकारला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याचबरोबर, सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमधील ‘अपना घर’ प्रकल्पातील जमीन घोटाळा आणि फसवणुकीच्या प्रकारावरही कडक भूमिका घेतली. नागरिकांना चांगली घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली असून मोकळ्या जागांवर आणि पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे इमारती उभारल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या बेकायदेशीर बांधकामांप्रकरणी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त पुरुषोत्तम शिंदे यांच्याकडून लेखी अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचेही सरनाईक यांनी विशेष कौतुक केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही