अंधेरी लोकलमध्ये दोन प्रवाशांच्या वादात भिरकावलेला चाकू भलत्याच्याच छातीत घुसला, आरोपी गजाआड

अंधेरी स्थानकावर विरार-चर्चगेट लोकलमध्ये दोन प्रवाशांच्या भांडणात एकाने फेकलेला चाकू दरवाजाजवळ उभ्या असलेल्या ५३ वर्षीय प्रवाशाच्या छातीत घुसल्याची घटना रविवारी घडली.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 17 नोव्हेंबर: विरार-चर्चगेट जलद लोकलने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमधील भांडणात एका निष्पाप प्रवाशाला नाहक जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. दोन जणांच्या वादातून एकाने रागाच्या भरात फेकलेला चाकू थेट दरवाजाजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या छातीत घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी २५ वर्षीय मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

धारावी येथे राहणारे ५३ वर्षीय सुरेश शर्मा हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी कामानिमित्त बोरिवलीला गेल्यानंतर ते विरार-चर्चगेट फास्ट लोकलने माघारी परतत होते. त्यावेळी त्यांच्या मागील सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये कोणत्यातरी कारणावरून शिवीगाळ व हाणामारी सुरू झाली. दुपारी ही लोकल अंधेरी रेल्वे स्थानकात थांबली. त्यावेळी भांडण करणारा एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरला, तर दुसरा डब्यातच उभा राहिला.

ट्रेन अंधेरी स्थानकातून पुढे मार्गस्थ होताच, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणाने संतापाच्या भरात डब्यात असलेल्या प्रवाशाच्या दिशेने एक धारदार चाकू भिरकावला. मात्र, त्याचा नेम चुकला आणि तो चाकू थेट दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या भागात जाऊन घुसला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे शर्मा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि डब्यात एकच खळबळ उडाली.

प्रवाशांनी साखळी ओढल्याने दुपारी १२:२१ वाजता ही लोकल वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर थांबवण्यात आली. शर्मा यांच्या छातीतून रक्तस्राव होत असल्याचे पाहून रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) निरीक्षक आर. के. शर्मा आणि उपनिरीक्षक अरुण कुमार पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शर्मा यांना बांद्रा स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात प्रथमोपचार देऊन तातडीने बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, चाकू फेकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा गायकवाड (२५) या आरोपीला रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. तपासात तो विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही