छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना (Sambhajinagar Crime) उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. रोहिणी मुकेश कुंभकर्ण असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कन्नड शहरातील गजानन कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. पती मुकेश कुंभकर्ण आणि पत्नी रोहिणी यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या मुकेशने टोकाचे पाऊल उचलत पत्नीला संपवले. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर तो घटनास्थळावरून पळाला नाही, तर त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. तेथे स्वतः हजर राहून त्याने पोलिसांसमोर पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपीने गुन्ह्याची माहिती देताच कन्नड पोलिसांनी तातडीने गजानन कॉलनीतील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील प्रक्रियेसाठी तो रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
पती-पत्नीमध्ये नेमका कोणता वाद होता आणि पतीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कन्नड पोलिसांकडून या हत्याकांडामागील हेतू आणि घटनाक्रमाचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गजानन कॉलनीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- CJP Protest : ‘पोलिसांना आम्ही २४ तासांची वेळ देतोय’, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची मोठी घोषणा
- विरोधात बोलल्याने माझ्यावर हल्ला, जरांगे पाटलांनीच सुपारी दिली; अमोल खुणेंचा गंभीर आरोप
- आदित्य आणि अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









