महिलेवर अत्याचार आणि १९ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला थेट दुबईतून अटक

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि १९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून बेड्या ठोकल्या आहेत.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर: लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून अटक केली आहे. मोहम्मद माझीन असे या आरोपीचे नाव असून, गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तो परदेशात लपून बसला होता.

छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद माझीन याने एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याशिवाय अन्य दोन महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. या तिन्ही महिलांकडून त्याने तब्बल १९ लाख ७३ हजार रुपये उकळल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.

गुन्हा दाखल होताच आरोपीने थेट दुबईला पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला. अखेर मोहम्मद माझीनला दुबईहून विमानाने केरळमध्ये आणण्यात आले आणि तेथून त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले आहे. परदेशातून आरोपीला अटक करण्याची शहर पोलिसांच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, मुंबई पोलिसांनीही २५० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार असलेल्या सलीम डोलाचा खास हस्तक साहिल शेख याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल शेखला भारतात आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

या ड्रग्ज प्रकरणात घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेल तपास करत आहे. या प्रकरणी साहिलचा अत्यंत जवळचा असलेला सलीम डोला आणि साहिल शेखचा लहान भाऊ मोहम्मद सलीम सोहेल शेख ऊर्फ लॅविश यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी आणि अभिनेता सिद्धांत कपूर यांचीही चौकशी करण्यात आली होती. आता साहिल शेखला ताब्यात घेतल्यामुळे २५० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही