कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला

कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबाराची घटना घडली असून, शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजा भिंगे याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे.

Published On: 

Pandharpur firing incident on history sheeter Raja Bhinge before Kartiki Wari

पंढरपूर, 18 नोव्हेंबर: कार्तिकी एकादशीला अवघे दोन दिवस उरलेले असताना पंढरपुरात गोळीबाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार राजा भिंगे याच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. वारीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना पंढरपुरातील इसबावी परिसरात रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. राजा भिंगे हे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर शतपावली करत होते. याच दरम्यान अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

गोळीबारानंतर जखमी भिंगे यांना तत्काळ जवळच्या लाईफलाईन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. राजा भिंगे यांच्यावर हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून अधिक तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही