शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या

पंढरपुरात रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजा भिंगे याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

Published On: 

Pandharpur firing incident and police investigation

पंढरपूर, 18 नोव्हेंबर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीच्या तोंडावर एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार राजा भिंगे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी तो घराबाहेर पडला असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.

ही घटना रात्री १० वाजेच्या सुमारास इसबावी परिसरातील त्याच्या राहत्या घरासमोर घडली. हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलमधून ३ ते ४ गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती असून, भिंगेच्या छातीत आणि पायात गोळ्या लागल्या. गंभीर अवस्थेत त्याला शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पंढरपुरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी करत संपूर्ण शहरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत आयफोनच्या ईएमआयवरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची चाकूने वार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतीक अंबवले असे मृत तरुणाचे नाव असून तो ७ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात त्याचा मित्र प्रतीक जाधव यानेच ही हत्या केल्याचे उघड झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

७ नोव्हेंबर रोजी पनवेल रेल्वे स्थानकावर भेटल्यानंतर दोघांनी शिवकर गावातील एका शाळेच्या पाठीमागे बसून मद्यप्राशन केले. प्रतीक अंबवले याने आयफोन खरेदी करण्यासाठी जाधवच्या नावावर कर्ज घेतले होते. मात्र, हप्त्याचे पैसे भरणे बंद केल्याने कर्ज देणाऱ्या कंपनीकडून जाधवला वारंवार फोन येत होते. याच रागातून जाधवने चाकूने वार करून अंबवलेची हत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या एका घटनेत, जळगावातील शिवाजी नगर परिसरात महापालिका कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा तरुणांनी गोळीबार केल्यानंतर तलवारी काढून दहशत माजवली. एक तरुणासोबत असलेल्या वादातून शिवीगाळ करत घरावर गोळीबार केल्याची माहिती आहे. मनपा कर्मचारी कुटुंबातील महिलेने घरावर गोळीबार झाल्याचे सांगत काही तरुणांनी तलवारी काढत दहशत माजवण्याची माहिती दिली आहे. आपल्या मुलाला दुपारी धमकी दिली होती, त्यातून गोळीबार तसेच तलवारी काढून दहशत माजवली असा आरोप महिलेने केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही