प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP Protest ) नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करण्यासाठी पोलिसांना २४ तासांची मुदत दिली आहे. अटी-शर्तींवर जामीन मिळाल्यानंतर आज या नेत्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलनाच्या परवानगीची मागणी केली.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना कालच जामीन मंजूर झाला आहे. अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याने ते सध्या दुःखात आहेत. त्यामुळे आज केवळ रांका आणि दास यांनी पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आपले शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील, अशी मोठी घोषणा सीजेपीने केली आहे. यावेळी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर सौरव दास यांनी गंभीर आरोप केले. दिल्ली पोलीस बेकायदेशीर आदेशांवरून काम करत असून स्वतंत्र पत्रकार आणि वकिलांशी क्रूर वर्तन करत असल्याचे ते म्हणाले. हे थेट लोकांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले.
आंदोलन करणे हा आपला संवैधानिक अधिकार असल्याचे सांगत सौरव दास यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. “पोलिसांना आम्ही २४ तासांची वेळ देतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तारीख आणि वेळ द्या. जंतर-मंतर आमचं आहे, तिथे परवानगी मिळालीच पाहिजे,” अशी मागणी दास यांनी केली. तसेच, पोलीस संपूर्ण दिल्लीत गोंधळ घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा; काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे थेट जाहीर करणार
- उच्च न्यायालयाच्या आदेशाने साखर कारखान्यांना दिलासा; १४ कारखान्यांचे ऊस गाळप परवाने मंजूर
- जळगावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरीचा प्रताप; सासरच्यांना जेवणातून विष देऊन रोकडसह पलायन
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









