Share

जळगावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरीचा प्रताप; सासरच्यांना जेवणातून विष देऊन रोकडसह पलायन

पारोळा तालुक्यातील वेल्हाणे गावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूने सासरच्या मंडळींना जेवणातून विष दिले. घरातील रोकड घेऊन पळालेल्या दोघींना पोलिसांनी धुळे सीमेवरून अटक केली.

Published On: 

Marriage scam Jalgaon bride poisoned in laws and arrested by police

जळगाव, 12 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस (Jalgaon Crime) आला आहे. वेल्हाणे गावात लग्नाच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी नववधूने सासरच्या संपूर्ण कुटुंबाला जेवणातून उंदीर मारण्याचे विष दिले. घरातील मंडळी बेशुद्ध पडल्याचे पाहून तिने एका साथीदारासह घरातील रोकड आणि मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांनी तातडीने पाठलाग करत या दोघींच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील ३२ वर्षीय वाल्मिक ताराचंद पाटील याचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे एका दलालामार्फत अडीच लाख रुपयांची बोली लावून झारखंड किंवा छत्तीसगड भागातून दोन मुलींना महाराष्ट्रात आणण्यात आले. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी या तरुणीसोबत वाल्मिकचा गावातच विवाह झाला.

लग्नाला तीन दिवसही उलटले नसताना ९ ऑक्टोबरच्या रात्री नवरी सुमन आणि तिची साथीदार आरती सूर्यप्रकाश पटेल यांनी मिळून भयानक कट रचला. त्यांनी फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई पाटील यांच्या जेवणात उंदीर मारण्याचे विषारी औषध मिसळले. कुटुंबातील सर्वजण बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर १० ऑक्टोबरच्या सकाळी या दोन्ही महिलांनी घरातील रोकड आणि इतर वस्तू घेऊन गावातून पळ काढला. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी ताराचंद आणि सरलाबाई यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

या गंभीर घटनेची माहिती वेल्हाणे येथील पोलीस पाटलांनी तातडीने पारोळा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस हवालदार सुनील हाटकर, शिपाई गवळी आणि शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित महिला धुळ्याच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पोलिसांनी दोघींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या दलालाचा पोलीस शोध घेत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही