प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: ‘एसआयआर’ (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची इंडिया आघाडीच्या नेत्यांची विनंती फेटाळण्यात आली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आधीच प्रलंबित असल्याचा दाखला देत, नेत्यांनी थेट याचिका दाखल करून न्यायालयात जावे असा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला आहे.
सरन्यायाधीशांनी ईमेलद्वारे विरोधी पक्षनेत्यांना उत्तर पाठवून भेटीला नकार देण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवसाच्या सुरुवातीला माहिती दिली होती की, विरोधी पक्षांनी सोमवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत सरन्यायाधीशांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. विरोधकांना या भेटीत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करायचे होते.
दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ११ ऑक्टोबर रोजी ट्विट करत, १२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयावर थेट मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयावर असा मोर्चा धडकणार आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणांना दिल्लीत पोलीस आणि भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप करत गांधी यांनी या मोर्चाची हाक दिली आहे.
हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून एक भारतीय म्हणून काढला जाणार असल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. यामध्ये सर्व विरोधी पक्ष, देशातील तरुण आणि नागरी समाज सहभागी होणार आहेत. ‘वोट चोरी’ थांबवावी, ‘एसआयआर’वर बंदी घालावी आणि ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन या मोर्चामार्फत सरन्यायाधीशांना दिले जाणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल आणि मोहन भागवत भारताचा आवाज दाबू शकत नाहीत, असेही गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली होती. तसेच ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर असे सलग चार दिवस विरोधकांनी याच मुद्द्यांवरून आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तीन वेळा ताब्यात घेतले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC अध्यक्ष भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने फेटाळली; शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती
- राज्यात दसऱ्यानंतर परतीचा पाऊस; पंजाबराव डख यांनी जाहीर केली जिल्ह्यांची यादी
- तुकाराम मुंढे MPSC समितीचे सचिव; विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवेंद्रराजेंची मोठी घोषणा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









