Share

राज्यात दसऱ्यानंतर परतीचा पाऊस; पंजाबराव डख यांनी जाहीर केली जिल्ह्यांची यादी

राज्यात दसऱ्यानंतर परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल याची यादी दिली आहे.

Published On: 

Maharashtra Rain Update Panjabrao Dakh weather prediction for farmers

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: महाराष्ट्रात सध्या पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दसऱ्यानंतर राज्यात परतीचा पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. खरीप हंगाम हातातून गेला असला तरी, आगामी रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी हा परतीचा पाऊस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या बाष्पामुळे हा पाऊस पडेल. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि कर्नाटकमधून येणारा हा पाऊस २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या चार दिवसांच्या काळात राज्याच्या विविध भागात मुक्काम करेल.

या परतीच्या पावसाची सुरुवात २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांमधून होईल. त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांपर्यंत पोहोचेल, असे डख यांनी स्पष्ट केले.

या पावसाचा जोर सर्वत्र सारखा नसेल. काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस पडेल, तर काही भागात शेतातून पाणी बाहेर वाहेल इतका जोरदार पाऊस होईल. याव्यतिरिक्त नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही काही प्रमाणात पावसाची शक्यता असून, १३ नोव्हेंबरपासून राज्यात खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. खरिपाचे नुकसान झाल्याने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. आता रब्बीच्या आशेवर असलेल्या बळीराजासाठी डख यांचा हा पावसाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही