Share

इंदूरमध्ये टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय; २२३ धावा करून कशी फिरवली मॅच?

टीम इंडियाने इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर वेस्ट इंडिजचा पराभव करत टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. जाणून घ्या सामन्याचे टर्निंग पॉईंट्स.

Published On: 

IND vs WI match team india innings update

इंदूर, 11 ऑक्टोबर: मागच्या सामन्यात २५० धावा करूनही पराभव पत्करावा लागलेल्या टीम इंडियाने इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर मात्र २२३ धावांच्या जोरावर आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (IND vs WI) 14 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २२३ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजला अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात मोठा धक्का दिला. संघासाठी घातक ठरू शकणाऱ्या शाई होपला त्याने अवघ्या ५ धावांवर त्रिफळाचीत केले आणि इथूनच भारताने अर्धी मॅच जिंकल्याचे चित्र निर्माण झाले.

यानंतर कामिल पुरन आणि शिमरॉन हेटमायर यांनी जवळपास ६० धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला सामना जिंकवून देण्याची भीती निर्माण केली होती. मात्र, नमन धीरने हेटमायरला ४३ तर पुरनला ४२ धावांवर बाद केले. या दोन महत्त्वपूर्ण विकेट्सनंतर खऱ्या अर्थाने मॅच फिरली.

त्यानंतर मैदानात आलेल्या रोव्हमन पॉवेलला अक्षर पटेलने ५ धावांवर तंबूत पाठवले. शेफर्न रदरफोर्ड आणि सॅम्पसन यांच्यात भागीदारी होताना दिसत असतानाच, नितीश रेड्डीने सॅम्पसनची विकेट काढत ती जोडी फोडली.

अखेरच्या टप्प्यात शामर स्प्रिंगरने ११ चेंडूत ३५ धावांची खेळी करत सामना जिंकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण विजयाचे लक्ष्य खूप दूर होते. वेस्ट इंडिजचा संघ केवळ 209 धावा करू शकला. त्यामुळे भारताने हा सामना १४ धावांनी जिंकला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही