Share

ठाण्यात हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीची सुटका

ठाणे पोलिसांनी मीरा-भाईंदर मार्गावर छापा टाकून एका हायप्रोफाईल देहव्यापार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे.

Published On: 

Pune Crime News: School Peon Arrested For Recording Videos of Girl Students in Changing Room

ठाणे, 11 ऑक्टोबर: ठाणे पोलिसांनी एका हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत एका ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका केली आहे. ही अभिनेत्री प्रामुख्याने हिंदी टीव्ही मालिका आणि डिजिटल वेब सीरिजमध्ये काम करते. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

एका एनजीओकडून पोलिसांना या टोळीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. आर्थिक गरज असलेल्या मॉडेल्स आणि नवोदित अभिनेत्रींना पैशांचे आमिष दाखवून बळजबरीने देहव्यापारात ढकलले जात असल्याचे यातून समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी मीरा-भाईंदर रस्त्यावरील एका नामांकित हॉटेलमध्ये सापळा रचला. पोलिसांनी आपला एक बनावट ग्राहक पाठवून व्यवहार निश्चित केला आणि पैसे स्वीकारताना प्रत्यक्ष छापा टाकला.

या कारवाईत ३९ वर्षीय मुख्य महिला दलाल तबस्सुम ऊर्फ सोनिया उमर कुरेशी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. ती मूळची छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील असून सध्या मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहत होती. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुंबईच्या रेस्क्यू फाउंडेशन संस्थेकडे सोपवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सोनिया आणि तिचा एक पुरुष साथीदार मिळून इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करणाऱ्या अभिनेत्रींना हेरून त्यांच्याकडून बळजबरीने हे कृत्य करवून घेत होते. सध्या या प्रकरणी कलम १४३ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल करून सोनियाला अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या पुरुष साथीदाराच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली असून, कलाविश्वातील नवोदित कलाकारांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही