Share

३०० च्या टार्गेटवर असलेली टीम इंडिया २२३ वर गार; इंदूरमध्ये वेस्ट इंडिजचे शानदार पुनरागमन

इंदूरमध्ये सुरुवातीच्या आक्रमक फलंदाजीनंतर भारतीय संघाचा डाव गडगडला. ३०० धावांचे लक्ष्य गाठेल असे वाटत असताना टीम इंडियाला २२३ धावांवर रोखण्यात वेस्ट इंडिजला यश आले.

Published On: 

IND vs WI match team india innings update

इंदूर, 11 ऑक्टोबर: इंदूरच्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ ३०० धावांचा टप्पा ओलांडेल असे सुरुवातीला वाटत होते. मात्र, आक्रमक सुरुवातीनंतरही भारतीय डाव गडगडल्याने टीम इंडियाला २२३ धावांवरच समाधान मानावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. सॅमसन अवघ्या ३ धावांवर बाद झाल्याने दुसऱ्या षटकात भारताची धावसंख्या ११ होती. त्यानंतर मैदानात आलेल्या ईशान किशनने अभिषेकसोबत मिळून अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने पुढील चार षटकांतच ७६ धावा कुटल्या, ज्यामुळे ६ षटकांअखेर भारताने ७६ धावांचा पल्ला गाठला.

आठव्या षटकापर्यंत या दोघांनी धावगती कायम ठेवत संघाला १०९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, रॉस्टन चेसने टाकलेले षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. चेसने १६ चेंडूत ३१ धावा करणाऱ्या ईशान किशनला आपल्या जाळ्यात ओढत स्टम्प आऊट केले. त्यानंतर काही समजण्याच्या आतच श्रेयस अय्यरला एलबीडब्ल्यू आऊट करत चेसने एकाच षटकात दोन मोठे धक्के दिले. या सामन्यात श्रेयस स्वस्तात माघारी परतला.

दहाव्या षटकात शामर स्प्रिंगरने अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेकने ३० चेंडूत ६९ धावांची झंझावाती खेळी केली. या ११ चेंडूंच्या अंतरात वेस्ट इंडिजने सामन्याचे चित्र पालटले आणि भारतावर आपली पकड घट्ट केली.

सुरुवातीचे तीन गडी बाद झाल्यानंतर भारतीय डाव सावरण्यात इतर फलंदाज अपयशी ठरले. एकामागून एक विकेट पडल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या. नमन धीर १०, नितीश कुमार रेड्डी २१ आणि तिलक वर्माने २८ धावा केल्या. तळाच्या फलंदाजांमध्ये अक्षरने २० तर अर्शदीपने ११ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात प्रिन्सने १३ धावा काढल्यामुळे भारताची धावसंख्या २२३ पर्यंत पोहोचू शकली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही